Talegaon Dabhade News: सामाजिक कार्यकर्ते सतीश खळदे यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे नामवंत व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते सतीश दत्तात्रय खळदे (वय 56) यांचे काल (शनिवारी) रात्री दहाच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, तीन भाऊ, चार बहिणी, पुतणे असा परिवार आहे. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेचे ते माजी उपाध्यक्ष होते. इंद्रायणी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी आणि तळेगाव दाभाडे मारुती मंदिर चौक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. शहरातील विविध सामाजिक संस्थांशी ते संबंधित होते. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. एक सुस्वभावी आणि मितभाषी व्यक्ती म्हणून ते सर्वांना परिचित होते.

काँग्रेसचे शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे, उद्योजक राजेंद्र खळदे, भास्कर खळदे तसेच ज्येष्ठ नेते मुकुंद खळदे यांचे ते बंधू होत. युवा कार्यकर्ते संकेत खळदे आणि सौरभ खळदे यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.