Talegaon Dabhade : शंकरमहाराज मराठे, नवनाथ पवार यांचा पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील प्रसिद्ध लेखक व कवी कै. वसंतराव मुरलीधर शिंदे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त वैराग्यमूर्ती हभप शंकरमहाराज मराठे यांना ‘मावळ वारकरीभूषण’ पुरस्काराने तर, कान्हेवाडी गावचे (ता.खेड) आदर्श सरपंच भाऊसाहेब तथा नवनाथ पवार यांना ‘कार्यगौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.

तळेगाव जनरल हाॅस्पिटलच्या रिक्रिएशन हाॅलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी साप्ताहिक अंबरचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर हे होते. यावेळी वारंगवाडी मावळ येथील स्वामी निरंजन आश्रमाचे स्वामी निरंजनानंद सरस्वती परमहंस व माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले.

  • यावेळी भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष हभप  बाळासाहेब काशिद, अॅड रवींद्र दाभाडे,संभाजी पवार, जीवन विद्या मिशनचे संतोषदादा तोत्रे, माजी नगराध्यक्ष कृष्णराव कारके, सुरेश चौधरी, सुदर्शन खांडगे, शिवाजी आगळे,पिराजी वारींगे सर,बाळासाहेब घोजगे आदि उपस्थित होते.

इतिहास संशोधक प्रा. डाॅ प्रमोद बोराडे,मावळ किसान संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार, जगन्नाथ भेगडे पाटील, चंद्रशेखर शिंदे, दीपक राऊत, भाऊसाहेब गायकवाड, निता देशपांडे, किसन ठाकूर, अण्णासाहेब दाभाडे, हभप नंदकुमार भसे, श्रीनिवास राऊत, प्रशांत मोरे,आदींनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सूत्रसंचालन व आभार गणेश शिंदे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.