Talegaon-Dabhade : एनएमआयईटी मध्ये कॅड सॉफ्टवेअर स्किल स्पर्धा उत्साहात

एमपीसी न्युज : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (एनएमआयईटी), येथील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागात “कॅड कॉम्पिटिशन युजिंग सॉलिड एज” (Talegaon-Dabhade)ही कॅड सॉफ्टवेअर स्किल-आधारित स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

सीमेन्सचे नॅशनल डिस्ट्रीब्युटर ‘बिटेल टेलिटेक लिमिटेड’ आणि अधिकृत चॅनेल पार्टनर ‘फोर डायमेन्शन इन्फोटेक’ यांनी प्रायोजित केलेल्या या स्पर्धेच्या उदघाटनच्या कार्यक्रमात कंपनीच्या या स्पर्धा आयोजनाबद्दल व उद्योग जगतात असलेल्या संधींबद्दल प्राचार्य डॉ.विलास देवतारे यांनी माहिती दिली.

या स्पर्धेत साहिल हजारे,मल्लिकार्जुन हेबळे व दीपक चौहान यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस जिंकले. (Talegaon-Dabhade) यावेळी बिटेल टेलिटेकचे कृणाल गिराडकर, दीपक धडगे ,फोर डायमेन्शनचे अंबरीश पवार आणि सीमेन्सतर्फे टेक्निकल कन्सल्टंट राहुल बुरकुले उपस्थित होते.

Sign language day : व्यांगांना प्रवाहात आणण्यासाठी सांकेतिक भाषेला प्रोत्साहन देणे गरजेचे – शेखर गायकवाड

या प्रसंगी कृणाल गिराडकर आणि सिमेन्स चे राहुल बुरकुले यांनी सिमेन्स कंपनी मध्ये असल्या कॅड डिझाईन मधील रोजगार संधी विषयी माहिती दिली. (Talegaon-Dabhade) मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ.सतीश मोरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. संतोष दाभोळे यांनी आभार मानले.

कार्यक्रम सूत्रसंचालन कु. साक्षी मदने व कु. मृण्मयी गद्रे यांनी केले.स्पर्धा-कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. संतोष दाभोळे यांनी विशेष प्रयत्न केले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे व्यवस्थापन, संचालक व प्राचार्य यांनी पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.