Talegaon Dabhade : आरोग्यसेवेचा वसा घेतलेल्या परिचारिकांनी विश्वासार्हता जोपासावी – गणेश खांडगे

एमपीसी न्यूज – परिचारिका रुग्णसेवेचे व्रत आणि आरोग्य सेवेचा (Talegaon Dabhade) वसा जपत असतात. त्याचप्रमाणे त्यांनी विश्वासार्हता जोपासावी, असे आवाहन तळेगाव जनरल हॉस्पिटल अ‍ॅण्ड काॅन्व्हलसंट होम नियामक मंडळाचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले. तळेगाव जनरल हॉस्पिटल अ‍ॅण्ड काॅन्व्हलसंट होमच्या भाऊसाहेब सरदेसाई स्कूल ऑफ नर्सिगचा 22 वा लॅम्प लाईटींग व शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात खांडगे बोलत होते.

लॅम्प लाईटींग व शपथविधी सोहळ्यासाठी तळेगाव जनरल हॉस्पिटल अ‍ॅण्ड काॅन्व्हलसंट होम नियामक मंडळाचे सभापती शैलेश शहा, विश्वस्त डाॅ. शाळिग्राम भंडारी, विश्वस्त हेमंत सरदेसाई, उपप्राचार्य दत्तात्रय कर्डिले उपस्थित होते. परिचारिकांना शपथ देण्यात आली. सर्व परिचारिका यांनी दीपप्रज्वलन करीत आरोग्य सेवेची शपथ घेतली. छोटेखानी समारंभात सेवेचा भाव व्यक्त करण्यात येत होता.

PMRDA : मांजरी खुर्द, कोलवडी नगररचना योजना मंजुरीसाठी शासनाकडे सादर

डाॅ. शाळिग्राम भंडारी म्हणाले,” परिचारिका यांनी रूग्ण संवाद शैली विकसित केली पाहिजे.रूग्ण सेवे सारखे पुण्य नाही. प्रमुख पाहुणे दत्तात्रय कर्डिले यांनी या क्षेत्रातील विविध संधी यांची माहिती दिली. नर्सिग मध्ये देखील डाॅक्टरेट मिळवता येते, त्यासाठी आवश्यक असणा-या सर्व संधी आपल्या देशात उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. सभापती शैलेश शहा यांनी मार्गदर्शन केले.

पालक प्रतिनिधी प्रविण लोंढे, प्रशिक्षणार्थी प्रफुल्ल लोंढे,दिव्या केदारी यांनी मनोगत व्यक्त केली. प्राचार्या मोनालिसा पारगे यांनी प्रास्ताविक केले. प्रतिक्षा बालगुडे व शुभांगी कदम यांनी सूत्रसंचालन केले. क्रिस्टना रणभिसे यांनी आभार मानले. स्नेहा आवळे यांनी प्रशिक्षणार्थी यांना शपथ दिली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.