Talegaon Dabhade: भगवान महावीर जन्मोत्सवानिमित्त अनाथाश्रमात व‌ पोलिसांना प्रसाद वाटप

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवारी (दि.6) भगवान महावीर जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. तळेगाव स्टेशन येथील उद्योगधाम कुष्ठरोग पुनर्वसन केंद्रातील मुले-मुली, वानप्रस्थाश्रम येथे असणारे आजी-आजोबा यांना लाडू प्रसाद म्हणून वाटप करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी तळेगाव स्टेशन जैन सकल संघातर्फे अध्यक्ष चंपाशेठ गदिया, उपाध्यक्ष महेंद्र  हिंगड, खजिनदार प्रकाश पालरेचा, सेक्रेटरी नेमीचंद गुंदेशा, महेंद्र राणावत, सुरेश हिंगड, दिलीप परमार, रमेश बाफना आदि मान्यवर उपस्थित होते.

जन्मोत्सवानिमित्त तळेगाव स्टेशन चौक, तळेगाव वडगाव फाटा, यशवंतनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तळेगाव स्टेशन बाजारपेठ, भगवान महावीर पथ, सोमाटणे फाटा टोल नाका, लिंब फाटा, मारुती मंदिर चौक, जिजामाता चौक, तळेगाव बाजारपेठ इत्यादी ठिकाणी 24 तास सेवा देणाऱ्या पोलिसांना प्रसाद म्हणून लाडू वाटप करण्यात आले.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, कामगार वर्ग, तळेगाव दाभाडे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या कडून महावीर जन्म कल्याणकच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.