Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे एकाला कोयत्याने मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज तळेगाव दाभाडे येथे तिघांनी कोयत्याने (Talegaon Dabhade) मारहाण करत एकाला लुटले आहे. ही घटना शनिवारी (दि.28) तळेगाव येथील बेलाडोअर सोसायटी जवळील ईगल कॅफे येथे घडली.

निखील तानाजी गडकर (वय 30 रा.तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून निखिल जाधव, ऋषिकेश कुतळ व नागेश नायडू सर्व रा. तळेगाव दाभाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : पुणेकरांना वंदेभारत एक्स्प्रेसचा प्रवास घडणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना मारहाण करत त्यांच्याकडून जबरदस्तीने मोबाईल व रोख रक्कम 2 हजार 500 रुपये असा एकूण 12 हजार 500 रुपयांचा ऐवज काढून घेतला तसेच खुर्चीने,पुल टेबलस्टीकने व कोयत्याने मारहाण करून जखमी केले. तसेच निखील याने जिवे मारून (Talegaon Dabhade) टाकण्याची धमकी देत कोयता हवेत फिरवला व दहशत निर्माण केली. यावरून तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.