Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन (Talegaon Dabhade) आणि इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. 25) होणाऱ्या या चर्चा सत्रात प्रसिद्ध साहित्यकार मार्गदर्शन करणार आहेत.

जागतिक स्तरावरील ख्यातनाम साहित्यिक डाॅ शरदकुमार लिंबाळे यांच्या कांदब-या आणि मराठी कांदबरी असा चर्चासत्राचा विषय असून सुप्रसिद्ध साहित्यिक व नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ पंडित विद्यासागर हे उदघाटक असतील. बीजभाषक म्हणून हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक व माजी प्रशासकीय अधिकारी दामोदर खडसे हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे हे असतील.

दुपारच्या सत्रात डाॅ विश्वनाथ शिंदे, डाॅ पृथ्वीराज तौर, डाॅ शिवदत्ता वावळकर व राकेश वानखेडे हे सनातन कांदबरी विषयी चर्चा करणार आहेत. या सत्राचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक डाॅ अश्विनी धोंगडे हया उपस्थित राहणार आहेत.

समारोपाच्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक ‘उचल्याकार’ लक्ष्मण (Talegaon Dabhade)गायकवाड तसेच ना. म. शिंदे हे मार्गदर्शन करणार असून संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे हे समारोप सत्राचे अध्यक्ष असणार आहेत.

या चर्चा सत्राचे विशेष आकर्षण म्हणजे डाॅ शरदकुमार लिंबाळे स्वतः उपस्थित राहणार असून, ज्येष्ठ पत्रकार व संपादक अरूण खोरे हे लिंबाळे यांची मुलाखत घेणार आहेत.

Pune : राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा; पुण्यात कॉंग्रेसचे आंदोलन

या चर्चासत्रास राज्यभरातून तसेच देशभरातून प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी उपस्थित राहणार असल्याची माहिती इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दि 21 रोजी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी मार्गदर्शन केले व मराठी विभागप्रमुख डॉ विजयकुमार खंदारे यांनी चर्चासत्र आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. या प्रसंगी मराठी विभागाचे डाॅ संदीप कांबळे, प्रा सत्यजित खांडगे, प्रभाकर तुमकर व पत्रकार उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.