Talegaon Dabhade : लोकमान्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे आजपासून आर्थो शिबिर

एमपीसी न्युज – तळेगाव दाभाडे येथील लोकमान्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे आज, बुधवार 12 ते 25 फेब्रुवारी दरम्यान आर्थो शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, फ्रॅक्चर या सारख्या आजारावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचार केले जाणार आहेत.

आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डाॅक्टर यांच्या साहाय्याने लोकमान्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने आत्तापर्यंत एक लाखापेक्षा अधिक यशस्वी अस्थिरोग शस्त्रक्रिया केल्या आहेत. तसेच सांधेरोपण शस्त्रक्रिया व रोबोटच्या सहाय्याने 5000 हुन अधिक यशस्वी गुडघेरोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी या सारख्या आजारानी त्रस्त असलेल्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी 9623928979  व 20 67286728 या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like