Talegaon Dabhade : पद्मश्री कर्तारसिंह यांच्या हस्ते कुस्ती प्रशिक्षक पै. अशोक जाधव यांचा गौरव

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील नामवंत कुस्ती प्रशिक्षक पै. अशोक जाधव यांचा कुस्तीक्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल ऑलिंपिक वीर आणि पंजाबचे माजी पोलीस अधीक्षक,पद्मश्री कर्तारसिंह याचे हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

गौरव समारंभ पंजाब येथील जालंदर येथे संपन्न झाला. यावेळी पंजाब कुस्ती महासंघाचे सचिव पी. आर. सोंधी, कप्तान कमलसिंह, भारतीय कुस्ती मासिकाचे सहसंपादक लियाकत हुसेन मिलन उपस्थित होते.

पै. जाधव हे नामवंत कुस्तीपट्टू असून त्यांनी कुस्ती क्षेत्रातील ‘तळेगाव केसरी’ हा किताब मिळविला आहे. सध्या ते विविध व्यायाम शाळामधून कुस्तीचे प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे येथील अनेक कुस्ती मैदानामध्ये त्यांनी नावलौकिक मिळविला आहे.

पै. जाधव यांनी आपल्या वैयक्तिक छंदातून १८५० साला पासूनचा  कुस्तीचा इतिहास, गाजलेल्या कुस्त्या, नामांकित मल्ल यांची माहिती तसेच जगभरातील गाजलेले नामांकित मल्ल, हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, जागतिक कुस्ती स्पर्धा,राष्ट्रकुल स्पर्धा, आशियायी व ऑलिंपिक स्पर्धा याच्या 5 हजार छायाचित्राचा संग्रह असून विविध ठिकाणी त्याचे प्रर्दशन भरविण्यात आले आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराचे मावळातून स्वागत होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.