Talegaon Dabhade: रस्त्यावरील चित्रांच्या माध्यमातून कोरोनाविषयी जनजागृतीचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे परिसरात तीन दिवसाच्या (दि 16, 17 व 18 एप्रिल) जनता कर्फ्यूच्या काळात गुरूवार ते शनिवार या तिन्ही दिवशी तळेगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. या तिन्ही दिवशी दवाखाने व औषधांची दुकाने सुरू ठेवण्यात आले होते. या काळात दोन चित्रकारांनी शहरातील प्रमुख चौकांमध्ये भव्य चित्रे रेखाटून कोरोनाविषयी जनजागृतीचा चांगला प्रयत्न केला आहे. 

पेन्टर रामदास घोडेकर (मामा) व त्यांचे सहकारी चित्रकार राजेश घोडेकर यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व जनजागृतीसाठी आपल्या कलेतून  तळेगावातील रस्त्यावर आणि मारूती मंदिर चौकात व स्टेशन विभागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि  जागोजागी काढण्यात आलेल्या अनेक चित्रांनी नागरिकांचे लक्ष वेधले असून तीन दिवसांच्या जनता कर्फ्युच्या तिस-या दिवशीही  तळेगाव शहरात कडकडीत बंद ठेण्यात आला होता.

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद, शहर समन्वय समिती, किराणा असोशिएशन आणि भाजीपाला व्यापारी यांच्या सहमतीने जनता कर्फ्युच्या कालावधी दि. १६, १७ व १८ एप्रिल रोजी (गुरुवार ते शनिवार) असा आहे. या तिस-या  दिवसाच्या काळात सकाळी दुग्ध व्यावसयिक तसेच काही दवाखाने व सर्व औषधांची दुकाने चालू ठेवण्यात आली होती.

या जनता कर्फ्युच्या काळात पेन्टर रामदास घोडेकर (मामा) व त्यांचे सहकारी  चित्रकार राजेश घोडेकर या दोघांनी  स्वखर्चांनी तळेगावातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर नागरिकांना कोरोना बाबतची माहिती व्हावी. तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन व्हावे म्हणून मोठी चित्रे रेखाटली आहेत. त्याच बरोबर सुंदर हस्ताक्षरात बोधवाक्येही लिहिली आहेत. या स्तुत्य उपक्रमाचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड तसेच तळेगावातील सुज्ञ नागरिक आणि लोकप्रतिनिधी आदींनी कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.