Talegaon Dabhade : परिन चेतन शाह यांना पीएचडी जाहीर

0 136

एमपीसी न्यूज – तळेगाव येथील परिन चेतन शाह यांना सीएसआयआर-नॅशनल केमिकल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथून पीएचडी प्राप्त झाली. त्यांनी “एस्परजिलस नायजर एनसीआयएम 563 मधील फायटेझ’वरील अभ्यास: उत्पादन, डाउनस्ट्रीम प्रक्रिया आणि अनुप्रयोग” या विषयावर प्रबंध सादर केला होता. परिन यांना एनसीएल येथील डाॅक्टर जे. ऐम. खिरे आणि डाॅ. सय्यद दस्तगिर यांचे मार्गदर्शन लाभले.

HB_POST_INPOST_R_A

परिन यांनी सेंट झेवियर्स स्कुल बोरिवली पूर्व, सरस्वती इंग्लीश स्कुल ठाणे, बालविकास स्कुल तळेगांव, एच. व्हि. देसाई कॉलेज पुणे येथून बीएससी मायक्रोबायोलॉजी, मॉडन कॉलेज पुणे येथून एमएससी मायक्रोबायोलॉजी, व्हिआयटी पुणे येथून डिप्लोमा ईन बायोटेक्नॉलॉजी (टॉपर), सिंबॉयसिस ईन्स्टिटयुट पुणे येथून एक्झिक्युटीव एमबीए (गोल्ड मेडल) पूर्ण केले.

परिन यांच्या हस्ते बालविकास शाळेने २६ जानेवारीला ध्वजवंदन करून व सेंट झेविअरस शाळेने २०१७ ला वार्षिक बक्षिस वितरण करुन, तसेच त्यांच्या समाजाने पुणे, अहमदाबाद व तळेगांव येथे सत्कार करुन अभिनंदन केले. तळेगांवच्या लौकिकात भर घातल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: