Talegaon Dabhade: पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने मावळात पाच व्हेंटिलेटरची मदत

Parth Pawar Foundation donates five ventilators to Maval

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार फॉऊंडेशनच्या वतीने रुग्णांना अत्यावश्यक पाच व्हेन्टिलेटर भेट देण्यात आले.

सोमाटणे येथील पवना हॉस्पिटल व स्पर्श हॉस्पिटल येथे मंगळवारी हे व्हेंटिलेटर रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आले.

मावळ तालुक्यात 640 कोरोना रुग्ण संख्या असून 188 रुग्ण उपचार घेत आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे. यातील अति गंभीर रुग्णांना  व्हेंटिलेटर मशीन अत्यावश्यक आहे.

कोरोना रुग्णांना उपचार देण्यासाठी  व्हेंटिलेटरचा तुटवडा होवू नये.  व्हेंटिलेटर  मशीनची गरज ओळखून मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पार्थ पवार फॉऊंडेशनच्या वतीने पाच  व्हेंटिलेटर  उपलब्ध करून दिले.

मावळ तालुक्यातील कोणताही रुग्ण उपचारांपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पवना हॉस्पिटलला व्हेंटिलेटर भेट देताना मावळचे आमदार सुनील शेळके, पवना हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सत्यजित वाढोकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.