Talegaon Dabhade : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी कार्यकर्ता मेळावा

एमपीसी न्यूज- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी (दि. 1) कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे येथील वैशाली मंगल कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला जास्तीतजास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले आहे.

या मेळाव्याला माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक विजयराव कोलते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश अप्पा थोरात, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी मावळचे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर, पुणे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष,नवनिर्वाचित सरपंच सुनील दाभाडे, मावळ तालुका खरेदी विक्री सहकारी संघाचे चेअरमन रोहिदास गराडे, तसेच मावळ तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंचांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.