Talegaon Dabhade: सांगुर्डी पाणंद रस्त्याच्या मुरुमीकरणाचे काम पूर्ण

Talegaon Dabhade: Pavement work of Sangurdi Panand road completed आता पावसाळ्यात ही बैलगाडी व ट्रॅक्टर वाहतुकीस अडचण असणार नाही. मोठी अडचण दूर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

एमपीसी न्यूज- वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या सांगुर्डी पाणंद रस्त्याचे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मुरुमीकरण करण्यात आले आहे. सुमारे दीड किलोमीटर पाणंद रस्त्याचे मुरुमीकरण केल्याने सुमारे 80 शेतकऱ्यांचा त्रास व अडचण दूर झाली आहे. खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसंत भसे यांच्या पुढाकारातून हे काम करण्यात आले आहे.

विशेषत: पावसाळ्यात या पाणंद रस्त्याने चिखलामुळे पायी जाणे ही कठीण होते. शेतीची अवजारे व शेतीमालाची वाहतूक डोक्यावरुनच करावी लागत असे. आता पावसाळ्यात ही बैलगाडी व ट्रॅक्टर वाहतुकीस अडचण असणार नाही. मोठी अडचण दूर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

आगामी एका वर्षाच्या आत याच पाणंद रस्त्याचे खडीकरणासह डांबरीकरण करण्यात येईल, अशी खात्री वसंत भसे व उपसरपंच उज्वला चव्हाण यांनी व्यक्त केली.

यावेळी शेतकरी शेखर भसे, गोविंद भसे, संदीप भसे, संतोष भसे, गणेश भसे, संजय भसे, रोहिदास भसे, सुनील भसे, सचिन लिंभोरे यांनी श्रमदानात सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.