BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांच्या हस्ते फिजिक जिमचे उदघाटन

एमपीसी न्यूज- व्यायामाच्या अत्याधुनिक साधनांनी नूतनीकरण केलेल्या खांडगे आर्केड मधील सुसज्ज फिजिक जिमचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या हस्ते रविवारी (दि. 3) करण्यात आले. त्याचप्रमाणे जीमचा 6 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मावळचे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके उपस्थित होते. यावेळी उद्योजक किशोर आवारे, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व नगरसेवक गणेश काकडे, अविनाश पाटील, सुहास गरूड, सुनील वाळुंज, राज खांडभोर, युवा उद्योजक आदित्य खांडगे, या जिमचे संचालक गणेश खांडगे, सुमीत भूतकर, संग्राम चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार सुनील शेळके म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातही अशा प्रकारची अत्याधुनिक जीम पाहायला मिळणार नाही, अशी जिम तळेगाव दाभाडे येथे आहे, हे आपल्यासाठी गौरवास्पद बाब आहे.

आदित्य खांडगे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन राज खांडभोर यांनी केले तर आभार संचालक गणेश खांडगे यांनी मानले. या जीममध्ये स्त्री आणि पुरुष मिळून दोन हजार सभासद आहेत. किकबॉक्सिंग, रोप क्लायम्बिंग, योगा, झुंबा, स्टीम तसेच व्यायामाची अत्याधुनिक साधने या ठिकाणी बसविण्यात आलेली आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3