Talegaon : जागरूक वाचक कट्टा समूहाच्या वतीने वडाच्या झाडांचे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – जागरूक वाचक कट्टा समूहाच्या वर्धापनदिनानिमित्त आणि वटपौर्णिमेचे औचित्य साधून वडाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यामुळे पुढील अनेक दशके मानवाला उत्तम आरोग्य, औषध आणि सावली मिळणार आहे.

तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या हस्ते वटवृक्ष रोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार जाधव गुरुजी, नगरसेवक अरुण माने, अर्चना काटे, राजेंद्र काटे, सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.

  • जागरूक वाचक कट्टा समूहाच्या वरिष्ठ सभासदांच्या हस्ते वटवृक्ष लावण्यात आले. हे वड तळेगाव दाभाडे ,मस्करनीस कॉलनी येथे लावण्यात आले. यामुळे आपल्या आठवणी पुढील कित्येक वर्ष राहणार आहेत. वडाचे झाड हे मानवासाठी वरदान आहे. त्यापासून सावली, लाकूड मिळते.

एवढ्यापुरते त्याचे गुणधर्म मर्यादित नाहीत. तर सर्दी, ताप, खोकला, कंबरदुखी, गर्भपात, मूळव्याध, मधुमेह, दमा यांसारख्या अनेक आजारांमध्ये वड लाभकारी आहे. यामुळे वड मानवासाठी फायदेशीर असल्याने जागरूक वाचक कट्टा समूहाच्या वतीने वडाचे रोपण करण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.