Talegaon Dabhade : शब्दश्रीमंती काव्यमंचतर्फे मासिक काव्यसंमेलन उत्साहात साजरे

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील कालेकर एज्युकेशन सोसायटीच्या शब्दश्रीमंती काव्यमंचाचे 6 वे मासिक काव्यसंमेलन रविवारी (दि. 23) पार पडले. उपस्थित कवींनी विविध विषयांवरील कविता सादर केल्या.

काव्यमंचच्या प्रथेप्रमाणे सर्प्रथम आलेल्या पहिल्या पाच कवी मधुन चिठ्ठी काढून ज्येष्ठ कवी अशोक सिंह परदेशी यांची कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी प्रथमच कथाकथन समाविष्ट करण्यात आले होते.

यावेळी रश्मी थोरात, वृषाली कदम, रुपाली जाधव, रामहरी घोलवे, योगेश शिंदे, मंदार आरोळे, श्रीकृष्ण पुरंदरे, डॉ. पांडुरंग भानुशाली, प्रा. भरतकुमार शुक्ल, श्रीकांत पेंडसे आदी कवी उपस्थित होते. विविध कवींनी विविध विषयांवर कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. कथाकथन मध्ये व. पु. काळे यांची संजीवनी विद्या, श्रीकृष्ण पुरंदरे यांची रघु आणि अनमोल जीवन अशा विविध विषयांवर कथासुद्धा सादर करण्यात आल्या. सर्वांचे स्वागत काव्य मंचाचे अध्यक्ष पूनम कालेकर यांनी केले

कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजन कवी व मंचाचे कार्याध्यक्ष श्रीवल्लभ कालेकर यांनी केले. श्रीराम हरी घोळवे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.