Talegaon Dabhade :  पोलीस वर्धापनदिनी शालेय मुलांना पोलीस शस्त्रांची माहिती

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या हस्ते पोलीस वर्धापन दिनानिमित्त महिला दक्षता समिती व पोलीस पाटील यांचा गौरव करण्यात आला तसेच शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांच्या शस्त्रास्त्रांची माहिती देण्यात आली.  

_MPC_DIR_MPU_II

पोलीस वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीविषयक नियम सांगून त्पाबाबत त्यांच्यात जागरुकता निर्माण करण्यात आली.

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील व महिला दक्षता समिती यांच्या निवडणूक व मोर्चे या काळातल्या योगदानाबद्दल त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. त्याप्रसंगी आदर्श विद्यालय, इंद्रायणी विद्यालय, पु. वा. परांजपे विद्यामंदिर विद्यालय यातील विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या शस्त्रांची माहिती घेतली त्यावेळेस कामगार नेते संदीप पानसरे यांच्यासहित तळेगाव दाभाडे येथील अनेक नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.