BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : कामगार कल्याण मंडळास जागा देण्याच्या ठरावास स्थगिती; तळेगाव नगरपरिषदेच्या सभेत 31 विषयांना मंजुरी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मारुती मंदिर चौकातील व्यापारी संकुलात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयास जागा देण्याच्या ठरावास स्थायी समितीच्या सभेत स्थगिती देण्यात आली. स्थायी समितीची सभा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.

सभेस माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे, बांधकाम समितीचे सभापती संतोष शिंदे, आरोग्य समिती सभापती रोहित लांघे, शिक्षण समिती सभापती कल्पना भोपळे, महिला बालकल्याण समिती सभापती प्राची हेंद्रे,आदि सदस्यासह उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे व सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते.

नगरपरिषदेने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयासाठी जागा देण्याचा ठराव कार्योत्तर मंजुरीसाठी सभेपुढे ठेवला होता.या ठरावास शहर विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे यांनी आक्षेप घेऊन त्यास विरोध केल्याने अखेर हा ठराव स्थगित ठेवण्यात आला. तसेच यासभेत हिंदमाता रेल्वे अंडर पासजवळ पत्राशेड तयार करण्याच्या ठरावास स्थगिती देण्यात आली. या सभेत एकूण ३१ विषयांना मंजुरी देण्यात आली.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3