Talegaon Dabhade : ‘पॉवरग्रीड’तर्फे नवलाख उंब्रे येथे 200 कुटुंबांना मोफत शिधावाटप

एमपीसी न्यूज  – आपल्या देशावर आलेल्या कोरोनारूपी संकटाला सामोरे जात असताना कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या नवलाख उंब्रे औद्योगिक परिसरातील सर्व उद्योगधंदे व त्याच्यावर अधारित असलेले व्यवसाय बंद आहे.  त्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या बाहेरील मोलमजुरी करणारे नागरिक आणि गावातील काही गरीब बांधवांची उपासमार होऊ नये, यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आवाहन केल्याप्रेमाणे त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामपंचायतीच्या आणि सरपंच दत्तात्रय  पडवळ यांनी विनंती केल्याप्रमाणे पॉवरग्रीड यांच्या माध्यमातून 200 कुटुंबांना अन्नधान्याचे संच वाटप करण्यात आले.

जीवनावश्यक वस्तूंचे संच साधारणपणे महिनाभर पुरेल या पद्धतीने पॉवरग्रीडचे उपमहाव्यवस्थापक मरियम्मा थाॅमस यांच्या मार्गदर्शनाखाली हे वाटप करण्यात आले.

यावेळी पावरग्रीड उपमहाव्यवस्थापक मरियम्मा थाॅमस, सरपंच दत्ता (आण्णा) पडवळ, व्यवस्थापक आरती गुप्ता, व्यवस्थापक शशिकांत चौधरी, तलाठी एस. एस. होरे, ग्रामविकास अधिकारी प्रमिला घोडेकर, अविनाश बधाले, पॉवरग्रीडचे अधिकारी टी. हरीश, अरविंद तितरमारे, एम. बी. खिलारे, विशाल शिंदे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी सरपंच दत्ता (आण्णा) पडवळ यांनी पॉवरग्रीडचे आभार मानले आणि नवलाख उंब्रे ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणा-या सर्व कंपन्यांना या आलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी आपण सर्वानी ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.