Talegaon Dabhade:  प्रज्ञेश असोसिएशनतर्फे वर्षा किबे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान 

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील  प्रज्ञेश असोसिएशन या संस्थेच्या वतीने जागतिक महिलादिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा प्रथमच संपन्न झाला. तळेगाव दाभाडे येथील वर्षा किबे यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान कऱण्यात आला. प्रकृती अस्वस्थतेमुळे त्या येऊ शकल्या नाहीत. त्यांच्यावतीने पैसाफंड वाचनालयाच्या विश्वस्त शकुंतला कटकर यांनी तो पुरस्कार स्वीकारला.

त्याच बरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असणा-या महिलांना सन्मानित करण्यात आले. संजीवनी मोहिते ( पुणे) – हिरकणी पुरस्कार, शीतल परूळेकर (सिंधुदुर्ग), प्रेमला यादव (पुणे), हेमलता पाटील (धुळे), कीर्ती टेेंभेकर (यवतमाळ), संध्याराणी कोल्हे (उस्मानाबाद), कलावती पहुरकर (ठाणे), विजया दांगट (पुणे) यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार व वैशाली मानकर यांना उत्कृष्ट प्रकल्प पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

महिला दिनानिमित्त ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ या अभियानाअंतर्गत आदर्श मातांचा देखील प्रशस्तिपत्रक देवून सन्मान करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे साहित्यिक शिरीष अवधानी तसेच माजी मुख्याध्यापिका ज्योती चोळकर, इरावती केतकर, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, पैसा फंड प्राथमिक शाळा शालेय समितीचे अध्यक्ष विनायक अंभ्यकर, डाॅ. आनंद वाडदेकर, साहित्यिक नितीन गायके, तळेगाव दाभाडे प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश बोरुडे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संयोजन संस्थेच्या अध्यक्षा ज्योती भेगडे- दुर्गे, उपाध्यक्षा अर्चना काटे, सचिव सतीश भेगडे, संचालिका वैशाली मानकर, ज्योती डुंबरे यांनी केले आहे. कल्पना गाडे यांनी सूत्रसंचलन केले तर छाया गाडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.