Talegaon Dabhade : सदूशिंदे लीग क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात प्रशांत वहिले क्लबचा दणदणीत विजय

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा क्रिकेट संघटना, सदूशिंदे लीगच्या क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात किरण धाडवे व उमेश विनोदे, गणेश धामणकर, प्रसाद गायकवाड यांच्या भेदक गोलंदाजीच्या माऱ्यासमोर तसेच कर्णधार मयूर अवचट यांच्या फलंदाजीच्या जोरावर शिवा क्रिकेट क्लबचा धुवा उडवीत प्रशांत वहिले क्लबने 7 गडी राखून दणदणीत विजय मिळविला.

लोणावळा येथील रेल्वे मैदानावर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत शिवा क्लबचा 120 धावात खुर्दा उडवत किरण धाडवे यांनी ३ विकेट घेत व उमेश विनोदे व गणेश धामणकर तसेच प्रसाद गायकवाड यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. रशांत वहिले क्लबच्या फिरकी मा-यासमोर एकही फलंदाज टिकाव धरू शकला नाही.

प्रशांत वहिले क्लबला 121 धावांचे आव्हान ठेवले असता वहिले क्लबचे कर्णधार मयूर अवचट फलंदाजी मध्ये 5 षटकार लगावत नाबाद 51 धावा केल्या. त्यांना अभिषेक दरेकर यांनी 22, नाबाद व संदीप खांडभोर यांनी 19 धावा करत साथ दिली. सदु शिंदे लीगच्या पहिल्या साखळी सामन्यात प्रशांत वहिले क्लबने 7 गडी राखून दणदणीत विजय प्राप्त केला. या सामन्यात किरण धाडवे हे मँन आँफ द मॅच किताबचा मानकरी ठरले.

संक्षिप्त धावफलक

शिवा क्लब (पुणे) 32 षटकात सर्व बाद 120 धावा ( राहुल -22,संतोष -21, किरण धाडवे 3/22, उमेश विनोदे -2/17, गणेश धामणकर,2/18, प्रसाद गायकवाड 2/20.) पराभूत विरुद्ध विजयी प्रशांत वहिले क्लब (मावळ) : 28.4 षटकात 3 बाद 121
(मयूर अवचट – 51, अभिजीत दरेकर -22 , संदीप खांडभोर 19, प्रवीण 1/5, संदीप 1/26.)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.