Talegaon Dabhade : प्रतिभा गाडेकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुणवंत क्रीडा पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज- इंद्रायणी महाविद्यालयातील क्रीडा शिक्षिका प्रा प्रतिभा नितीन गाडेकर यांना 2018 – 2019 या वर्षातील महिला गुणवंत क्रीडा शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रजासत्ताक दिनी शिवाजीनगरमधील पोलीस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांचे हस्ते गाडेकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समितीकडून 2018 – 2019 या वर्षासाठी पुरस्कार देण्यात आला. रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गुणवंत क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार चंद्रकांत शेटे व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ संभाजी मलघे यांनी गाडेकर यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.