22.4 C
Pune
शनिवार, ऑगस्ट 13, 2022

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे प्रेस फौंडेशनच्या अध्यक्षपदी अमिन खान, सचिवपदी राजेश बारणे ; कार्यकारिणीची निवडणूक बिनविरोध

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे प्रेस फौंडेशनच्या अध्यक्षपदी ‘आज का आनंद’चे ज्येष्ठ पत्रकार अमिन खान यांची रविवारी (दि.31) सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी ‘महाराष्ट्र लाईव्ह-1’ चे सचिन शिंदे आणि ‘पुढारी’चे बातमीदार जगन्नाथ काळे, सचिवपदी ‘आवाज न्यूज चॅनेल’चे उपसंपादक राजेश बारणे आणि ‘सकाळ’चे बातमीदार राधाकृष्ण येणारे यांची कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

ज्येष्ठ पत्रकार आणि ‘एमपीसी न्यूज’चे संपादक संचालक विवेक इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत सन 2022-23 च्या कार्यकारिणीची निवडणूक बिनविरोध झाली.

यावेळी व्यासपीठावर ‘सकाळ’चे ज्येष्ठ छायाचित्रकार व बातमीदार रमेश जाधव (गुरुजी), ‘लोकमत’चे सहसंपादक योगेश्वर माडगूळकर, ‘आवाज न्यूज’चे संपादक गोपाळ परदेशी आणि प्रेस फौंडेशनचे संस्थापक विलास भेगडे उपस्थित होते.
सूचक आणि अनुमोदक सदस्यांनी पिठासन अधिकारी विवेक इनामदार यांच्याकडे एकूण नऊ जागांसाठी उमेदवारांच्या नावाचे प्रस्ताव मांडले. प्रत्येक जागेसाठी एकच नाव आल्याने आणि ती वैध ठरल्यानंतर पदानिहाय निर्वाचित कार्यकारिणीची घोषणा त्यांनी केली.
नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. गोपाळ परदेशी,जगन्नाथ काळे,अंकुश दाभाडे आणि राजेश बारणे यांची अभिनंदनपर भाषणे झाली.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष अमिन खान यांनी पत्रकारिता आणि पत्रकार यांच्या उन्नतीसाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
योगेश्वर माडगूळकर यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक विलास भेगडे यांनी केले. सूत्रसंचालन कैलास भेगडे यांनी केले. महेश भागीवंत यांनी आभार मानले.
नवनिर्वाचित कार्यकारिणी याप्रमाणे:-
तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन कार्यकारणी (सन २०२२- २३)
अध्यक्ष – अमिन खान (आज का आनंद, संध्यानंद),
कार्याध्यक्ष- राधाकृष्ण येणारे (सकाळ),
उपाध्यक्ष- सचिन शिंदे(महाराष्ट्र लाईव्ह 1), जगन्नाथ काळे (पुढारी),
सचिव- राजेश बारणे (आवाज न्यूज चॅनेल) ,
सहसचिव- महेश भागिवंत (2टाईम्स ऑफ न्यूज),
खजिनदार – अंकुश दाभाडे (प्रजावार्ता),
प्रकल्प प्रमुख- रेश्मा फडतरे (आवाज न्यूज चॅनेल),
पत्रकार परिषद प्रमुख: विलास भेगडे(लोकमत)
कायदेशीर सल्लागार- ॲड. संविद  पाटील.
सल्लागार- विवेक इनामदार (एमपीसी न्यूज), योगेश्वर माडगूळकर (लोकमत), रमेश जाधव गुरुजी (सकाळ), मंगेश फल्ले (दिव्य मराठी),
अनिल भांगरे (सा. महाराष्ट्र क्रांती), गोपाळ परदेशी (आवाज न्यूज चॅनेल), प्रा. नितीन फाकटकर (मावळ रोखठोक)
कार्यकारणी सदस्य खालीलप्रमाणे:-
ऋषिकेश लोंढे, संतोष थिटे, प्रकाश यादव, संदीप भेगडे, अभिषेक बोडके, ज्ञानेश्वर टकले, चित्रसेन जाधव(प्रेस फोटोग्राफर) बद्रिनारायण पाटील, रमेश फरताडे, चंद्रकांत लोळे, विकास वाजे, केदार शिरसट, भारती गायकवाड आणि कैलास भेगडे.
पत्रकारितेची मूल्ये जपणे गरजेचे! – विवेक इनामदार
अध्यक्षीय भाषणात विवेक इनामदार यांनी पत्रकारितेची बदलत चाललेली तंत्रे आणि आव्हाने यांचा आढावा घेतला. ते म्हणाले की, प्रत्येक पत्रकाराने आता माध्यमातील तंत्र कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. पत्रकारांना धमक्या, दबाव आणि तत्सम प्रसंगांना सामोरे जावे लागते, हा आपल्या कामाचाच भाग आहे. त्याचा बाऊ न करता पत्रकारितेची मूल्ये जपत काम केले पाहिजे. हे काम संघटितपणे केले तर ते अधिक प्रभावी होते. नूतन अध्यक्ष अमिन खान यांना वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल प्रसार माध्यमातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असल्याने प्रेस फौंडेशनच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून ते भरीव योगदान देतील.

spot_img
Latest news
Related news