Talegaon News: तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचा 50 हजार लसीकरणाचा टप्पा पार

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यास जोडून असलेल्या उपकेंद्रांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने 50 हजाराचा टप्पा 17 सप्टेंबर रोजी पार केला. या केंद्र व उपकेंद्रामधून कोविशील्ड व कोव्हॅक्सिन ही लस देण्यात येत आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जयेश बिरारी व सहाय्यक डॉ. दीपक ढवळे यांनी दिली.

तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या तळेगाव दाभाडे स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदोरी, सुदुंब्रे, आंबी, निगडे, नवलाखउंब्रे, आंबळे ही उपकेंद्र येत आहेत. या गावामध्ये कोविडशील्ड व कोव्हॅक्सिन या लसीचे लसीकरण करण्यात आले.

यामध्ये अनुक्रमे गावाचे नाव, पहिला डोस,  दुसरा डोस,  एकूण  लसीकरण  पुढील प्रमाणे – 1) तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र – कोविडशील्ड व कोव्हॅक्सिनचे मिळून पहिले 15 हजार 186 व दुसरे 6 हजार 986 असे एकूण 22 हजार 172, 2) आरोग्य केंद्र तळेगाव स्टेशन -पहिले 8 हजार 616 व दुसरे 6 हजार 231 असे एकूण 15 हजार 47, 3) इंदोरी- पहिले 8 हजार 822 व दुसरे 1 हजार 553 असे एकूण 10 हजार 375,

फक्त कोविडशील्ड कोविड लस घेतलेली उपकेंद्र  4) सुदुंबरे – पहिले 1 हजार 23 व दुसरे 231 असे एकूण 1हजार 54,

 5)आंबी -पहिले  905 व दुसरे 209 असे एकूण 1 हजार 114 , 6) नवलाख उंब्रे –  पहिले 1 हजार 798 व दुसरे 372 असे एकूण 2 हजार 170 ,7) निगडे -पहिले  591 व दुसरे 135 असे एकूण 726, 8) आंबळे -पहिले 243 व दुसरे 99 असे एकूण 342,

याप्रमाणे तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रामधून  पहिला  डोस 37 हजार 384 तर दुसरा डोस 16 हजार 16 झाले असून एकूण 53 हजार 400 लसीकरण झाल्याची माहिती डॉ.दीपक ढवळे यांनी दिली.

या लसीकरण मोहिमेमध्ये तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी, केंद्रांमधील मधील अधिकारी,कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले असून यापुढे ज्यांचे लसीकरण शिल्लक आहे. त्यांनी लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयेश बिरारी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.