Talegaon Dabhade : पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत 35 गोरगरीब महिलांना गॅस कनेक्शन वाटप

एमपीसी न्यूज- पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत 35 मागासवर्गीय महिलांना गॅस कनेक्शन देण्यात आले. यामध्ये शेगडी, सिलेंडर, पाईप, रेग्युलेटरचे वाटप करण्यात आले. या योजनेसाठी 500 महिलाची नावनोंदणी करण्यात आली होती त्यामध्ये पहिल्या टप्प्यात 35 महिलांना गॅस कनेक्शन देण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव नगरसेवक संतोष भेगडे, आनंद भेगडे यांनी केले. या कार्यक्रमाला काकडे गॅस एजन्सीचे संचालक विकीशेठ काकडे, अभिजित काकडे, ऊर्मिला काकी भेगडे, बबनराव घोडके, किरण गरुड, रुपेश गरुड, सिद्धेश भेगडे, लाभार्थी महिला व इतर मान्यवर उपस्थित होते.

ही योजना फक्त मागासवर्गीय महिलांसाठी असून या योजनेअंतर्गत फक्त 350 रुपयांमध्ये गॅस कनेक्शन मिळते. त्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा जातीचा दाखल, बँकेचे पासबुक कुटुंबातील 20 वर्षांपुढील कोणत्याही व्यक्तीचे आधारकार्ड अशी कागदपत्रे जमा करावयाची आहेत. या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव नगरसेवक संतोष भेगडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.