Talegaon Dabhade : समर्थ शलाका स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

एमपीसी न्यूज – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ आणि कै ॲड शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या समर्थ शलाका स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ पार (Talegaon Dabhade) पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम होण्यासाठी  विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन आपला आत्मविश्वास वाढवावा असे प्रतिपादन शिंदे यांनी केले.
नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ आणी कै ॲड शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या  समर्थ शलाका स्पर्धा परीक्षेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून शिंदे या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष गणेश खांडगे हे होते तर यावेळी सचिव संतोष खांडगे,ज्येष्ठ  संचालक  दामोधर शिंदे,महेश शहा,सोनबा गोपाळे गुरूजी,शंकरराव नारखेडे  तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मिळकत व्यवस्थापक जयंत मदने  यावेळी उपस्थित होते.

 

Maval : सौभाग्यवती 2023 स्पर्धेत महिलांनी जिंकली लाखोंची बक्षिसे

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना  संस्थेचे सचिव संतोष खांडगे म्हणाले की, शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना  स्पर्धात्मक परीक्षेची (MPSC, UPSC) ओळख व्हावी म्हणून नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाने संस्थेच्या सर्व माध्यमिक शाळातील इयत्ता 9 वीतील विद्यार्थांकरिता समर्थ शलाका स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले होते.
त्या परीक्षेचा पारितोषिक  समारंभ  आज होत असून भविष्यात दरवर्षी या परीक्षा घेतल्या जातील , अशी घोषणा  सचिव खांडगे यांनी यावेळी  केली.

विद्यार्थ्यांनी उच्च शैक्षणिक गुणवत्ता  प्राप्त केल्यास त्याना स्वताःच्या   पायावर सहज उभे राहता येते, असे शिंदे यावेळी म्हणाल्या तर उच्च  पदाची नोकरी  मिळविण्यासाठी  स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होणे महत्वाचे आहे ,असे मिळकत व्यवस्थापक जयंत मदने म्हणाले.
नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ ही संस्था देशातील सर्वात जुनी  शैक्षणिक संस्था असुन भविष्यात  देशाला लागणारा प्रशासनवर्ग या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उपलब्ध  होऊ शकेल असा विश्वास संस्था  उपाध्यक्ष गणेश खांडगे यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक   कैलास पारधी,संजय वंजारे,पांडुरंग  पोटे, सुदाम वांळुज,भाऊसाहेब  आगळमे,कदमबांडे तसेच शिक्षक  विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गुणवत्ता यादीत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था  सचिव संतोष खांडगे यांनी केले (Talegaon Dabhade) तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रभा काळे, रेवाप्पा शितोळे यांनी केले.आभार   प्रकल्प सहप्रमुख सोनबा गोपाळे गुरूजी यानी मानले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.