Talegaon Dabhade : नगरपरिषदेच्या हळदी कुंकू समारंभास महिलांचा उत्स्फूर्त सहभाग 

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषद, महिला व बालकल्याण समितीच्या वतीने मंगळवारी (दि. 11) स्वच्छ भारत अभियान – जनजागृती व प्रबोधनासह हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात हिंगणघाट येथील जळीतकांडातील निर्भयास आदरांजली वाहण्यात आली. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे होत्या. यावेळी मावळ तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, सहायक पोलीस अधीक्षक कुंदा गावडे, राजमाता जिजाऊ मंच अध्‍यक्षा सारिका संजय  भेगडे, सारिका गणेश भेगडे, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, महिला व बालकल्याण समिती सभापती – काजल गटे, उपसभापती कल्पना भोपळे, नगरसेविका मंगल जाधव, शोभा भेगडे, श्वेता झिंजाड, उपमुख्‍याधिकारी सुप्रिया शिंदे सह आजी माजी नगरसेवक,नगरसेविका पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

उपस्थित मान्यवरांनी मनोगतामधून आपले शहर सुंदर आणि स्वच्छ असावे यासाठी आपल्या घरापासूनच सुरुवात केली पाहिजे, तसेच महिलांनी आत्मनिर्भर ,स्वावलंबी व निडर राहिले पाहिजे, असे विचार व्यक्त केले. यावेळी ओला कचरा वेगळा ठेवण्यासाठी उपस्थित सर्व महिलांना डस्टबिन देण्यात आली. स्वच्छतेचा संदेश देणारे सुंदर पथनाट्य रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनच्या विद्यार्थिनींनी सादर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक काजल गटे यांनी, सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी यांनी तर आभार  हेमलता खळदे यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like