Talegaon Dabhade : राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्याबद्दल तळेगाव शहर काँग्रेस कमिटीकडून निषेध

एमपीसी न्यूज – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्य पद (Talegaon Dabhade) रद्द झाले. याचा तळेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करण्यात आला. राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होत असून याचा भाजपने धसका घेतला आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजपकडून हे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते सहकार महर्षी माऊली दाभाडे, यादवेंद्र खळदे, राजेंद्र पोळ, विशाल वाळुंज, भूषण खळदे, संभाजी राक्षे, अमर मोहिते, प्रशांत काजळे, नितीन माने, सागर वाळुंज, विक्रांत वाळुंज, प्रभाकर ओंकार, प्रशांत काजळे, मिलिंद करंजकर, सुनील वाळुंज, प्रवीण पाटील, किरण मोकाशी, ॲड राम शहाणे, पंढरीनाथ मखामाले, प्रतीक बर्डे,अब्बास नालबन,संजय बनसोडे, अनिल बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना यादवेंद्र खळदे यांनी मोदी सरकारला विरोधक नको या हुकूमशाही सरकारचा निषेध व्यक्त केला. ही लोकशाहीची हत्या मोदी सरकार वारंवार करतोय या गोष्टीची खंत वाटते.

सहकार महर्षी माऊली दाभाडे यांनी मोदी सरकार लोकशाहीची हत्या करते मोदी सरकार हे राहुल गांधीला घाबरले आहे. भारत जोडो यात्रेचा परिणाम होऊन जनजागृती झाली आहे 2024 जनता यांना घरी बसवणार आहे (Talegaon Dabhade) असे मनोगत व्यक्त केले. देशाला अस्थिर करण्याचं काम भाजप सरकार वारंवार देशामध्ये व राज्यांमध्ये करताना दिसतोय लोकांमध्ये या गोष्टीची तीव्र नाराजी दिसून येत आहे.

Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात कॉमर्स फेस्टिवलचे उद्घाटन

सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष विशाल वाळुंज यांनी मोदी सरकारचा समाचार घेताना ईडी, सीबीआयचा सर्रास उपयोग होतो आणि दबाव तंत्राचे राजकारण केले जाते.भारतीय जनता पक्षाने राहुल गांधी यांचे सदस्य रद्द करून त्यांना संपवण्याचा नाही तर त्यांना मोठे करण्याचे काम केलं आहे.

अमर (जितू) खळदे यांनी आदनीच्या प्रश्नांवर उत्तर देणे मोदी सरकार टाळते आदानीचे नाव काढल्यावर लोकसभेचे स्पीकर हे माईक बंद करतात अशी भावना व्यक्त केली व्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचे काम मोदी सरकार सभेमध्ये वारंवार करताना दिसतोय.

याप्रसंगी प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष राजेंद्र पोळ यांनी केले. आभार संकेत खळदे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.