Talegaon Dabhade: इंदोरीत उद्यापासून 15 दिवसांसाठी जनता संचारबंदी

Talegaon Dabhade: Public curfew in indori for 15 days from tomorrow संचारबंदी काळात विना मास्क तसेच विनाकारण घराबाहेर पडणारे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत.

एमपीसी न्यूज- इंदोरी येथे वाढत चाललेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने दि. 24 जुलै ते 07 ऑगस्ट अखेर स्वयंस्फुर्तीने जनता संचारबंदी जाहीर केली आहे.

इंदोरीत दि. 21 जुलै अखेर कोरोनाचे 21 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. कोरोनाबाबतच्या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन मावळचे तहसिलदार मधुसूदन बर्गे व गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी गावास भेट दिली.

ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी यांच्याशी एकत्रित चर्चा करुन मार्गदर्शन केले. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसारच जनता संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले आहे.

लॉकडाऊन काळातही अनेक दुकानदार व अनेक बेफिकीर लोकांमुळे इंदोरीत कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. म्हणूनच जनता संचारबंदीचा निर्णय घेतल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.

संचारबंदी काळात विना मास्क तसेच विनाकारण घराबाहेर पडणारे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत.

या काळात भाजी मंडईसह सर्व दुकाने बंद राहणार आहेत. मात्र बँका, दवाखाने व औषध दुकाने ठरलेल्या वेळेत सुरु राहतील. दूध डेअरी व दूध संकलन केवळ सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 5 ते 7 सुरु राहणार असल्याचे कळवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.