Talegaon Dabhade: बेकायदा गौण खनिज उत्खनन प्रकरणी नायब तहसीलदारांकडून पंचनामा

Talegaon Dabhade: Punchnama issued by Deputy Tehsildar in case of illegal mining of minor minerals

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील सर्व्हे नं 68 या  शासकीय गायरान जमिनीमध्ये गेली अनेक वर्षांपासून हजारो ब्रास गौण खनिज उत्खनन झाले असून तसेच मागील आठवड्यात काही अज्ञात इसमांनी  शेकडो ब्रास गौण खनिज बेकायदेशीर उत्खनन करून नेल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामा केला.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगरसेवक अरुण माने, आरटीआय कार्यकर्ते जमीर नालबंद, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी सदर प्रकरणात सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करणे बाबत मावळचे  तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन दिले होते.
याची दखल घेत तहसीलदार यांनी निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांचे नेतृत्वाखाली चौकशी पथक नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. सदर आदेशानुसार सोमवार सायंकाळी सदर पथकाने सर्व्हे नं 68 मधील उत्खनन झालेल्या ठिकाणी पंचनामा  केला. या वेळी 210 ब्रास उत्खनन केल्याचे आढळून आले.
गेली अनेक वर्षे गौण खनिज उत्खनन व आताचे उत्खनन याची सक्षम अधिकारी व प्रमाणित मोजमाप करणाऱ्या यंत्रणेमार्फत नेमके किती उत्खनन झाले आहे, याची आकडेवारी घेऊन कलम 459 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी नगरसेवक अरुण माने, जमीर नालबंद व दिलीप डोळस यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.