BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : पुणे जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सदस्यपदी ज्येष्ठ पत्रकार बी एम भसे यांची निवड

एमपीसी न्यूज- शासनाच्या पुणे जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी ज्येष्ठ पत्रकार बी एम भसे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रल्हाद हिरामणी यांनी भसे यांना दिले.

भसे हे तळेगाव शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष, विद्यमान विश्वस्त असून तालुक्यातील शैक्षणिक संस्थांवर पदाधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत.

भसे यांच्या बरोबरच जिल्ह्यातून संभाजी मारूती साळवे (जुन्नर), श्रीमती गौरी चित्तरंजन गायकवाड (हवेली), श्रीमती शबनम सलीम मोमीन (आंबेगाव), शिवाजी बाळासाहेब भुजबळ (शिरूर) यांची देखील अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संपूर्ण मावळ तालुक्यातून शासकीय व संरक्षण दलातील सेवानिवृत्त मान्यवर व्यक्तींपैकी बी एम भसे यांची एकमेव समितीवर निवड झाल्याबद्दल सर्व स्तरावर त्यांचे अभिनंदन होत आहे.

.