Talegaon Dabhade : लोकनृत्य स्पर्धेत जिल्हा पातळीवर पुसाणे शाळा प्रथम

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव २०१९-२० अंतर्गत म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रिडानगरी येथे झालेल्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुसाणे शाळेने मिळवला.

पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील प्रथम क्रमांकांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.सर्व तुल्यबळ संघामधून पुसाणे शाळेने प्रथम क्रमांक मिळवला. या शाळेचा सन्मान जिल्हा परिषदचे शिक्षण अधिकारी सुनील कु-हाडे, उपशिक्षण अधिकारी स्मिता परिहर, मुळशीच्या सभापती राधिका कोंढरे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला.

मावळ मधील पुसाणे शाळेने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल मावळच्या गटशिक्षणाधिकारी मंगला वाव्हळ, विस्तार अधिकारी रामराव जगदाळे, केंद्रप्रमुख विजय मारणे, सरपंच संजय आवंढे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन वाजे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक अरुण साळुंखे, वैशाली मिसाळ, सुभाष गोफणे, प्रमोद भोईर, विवेक बोरसे आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या यशाची माहिती गावात समजतात विद्यार्थी व शिक्षक गावात येताच त्यांचे गावातील महिलांनी औक्षण करुन तर ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळून मिरवणूक काढुन स्वागत केले.त्यामुळे विद्यार्थी गावकर्यांनी केलेल्या ह्या अनपेक्षित स्वागतांने भारावून गेले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.