Talegaon-Dabhade: पुणे पीपल्स को.ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांना विजयी करा

एमपीसी न्युज : पुणे पीपल्स को.ऑपरेटिव्ह बँकेच्या 70 वर्षांच्या काळात भाग भांडवल सात पटींनी वाढले आहे. राखीव निधी, ठेवी, एकूण कर्ज, नफा यामध्ये देखील वाढ झाली. मागील संचालक मंडळाच्या अनुभवी नियोजन व पारदर्शक कारभार आणि विशेष प्रयत्नांमुळे प्रतिकूल परिस्थितीतून सावरत बँकेच्या प्रगतीचा आलेख कायम चढता राहिला आहे. बँकेने आजवर दैदिप्यमान कारभार उभा केला आहे. संचालक मंडळावर विश्वास दाखवत मागील वर्षी बिनविरोध निवडणूक झाली.(Talegaon-Dabhade) पण यावर्षी काही असंतुष्ट मंडळींच्या आग्रहामुळे निवडणूक होत आहे. उत्कर्ष पॅनलचे सर्व उमेदवार अनुभवी, विविध क्षेत्रात पारंगत आहेत. तळेगाव येथे 22 वर्षापूर्वी पुणे पीपल्स को.ऑपरेटिव्ह बँकेची शाखा सुरू झाली. तळेगाव विभागात 2500 मतदार आहेत. जास्तीत जास्त 95% मतदान करून उत्कर्ष पॅनलला बहुमताने विजयी करा, असे आवाहन बँकेचे संचालक बबनराव भेगडे यांनी केले.

 

तळेगाव दाभाडे येथील ईशा हॉटेलमध्ये झालेल्या प्रचार सभेच्या शुभारंभ प्रसंगी भेगडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, सुरेश धोत्रे, सुरेश चौधरी, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठल शिंदे, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश काकडे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बबनराव भोंगाडे,मावळ खादीग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, सुभाष राक्षे,माजी नगरसेवक रामभाऊ गवारे,अशोक भेगडे, सुदर्शन खांडगे,भाजप तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष किशोर सातकर, माजी सरपंच संतोष जांभुळकर,विजय सातकर, बाबाजी गायकवाड,तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष आशिष खांडगे,संदीप  काशिद,कालीदास शेलार, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या रूपाली दाभाडे, शैलजा काळोखे,विना करंडे देहूच्या नगराध्यक्ष स्मिता चव्हाणसह उमेदवार व यावेळी पंचक्रोशीतील औद्योगिक क्षेत्रातील, सहकारी क्षेत्रातील मान्यवरांसह कामगार वर्ग अनेक कंपन्यांचे कामगार नेते, बँकेचे सभासद अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Amol Awate: पहिल्याच प्रयत्नात आयएएस उत्तीर्ण होणाऱ्या लेफ्टनंट कर्नल अमोल आवटे यांचा रविवारी सत्कार

भेगडे पुढे म्हणाले पुणे पीपल्स को.ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उत्कर्ष पॅनलने अनुभवी नियोजन तसेच पारदर्शक कारभारासाठी विमानाचे चिन्ह निवडले आहे. माझ्यासह 13 उमेदवारांना जास्तीत जास्त 95% मतदान करून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन भेगडे यांनी केले. 2007 साली संचालक म्हणून आम्ही बँकेवर आलो त्यावेळी बँकेची स्थिती प्रतिकूल होती. असे असताना माझ्यासह सर्व सहकारी संचालकांचा बँकिंग क्षेत्रातील दांडगा अनुभव असल्याने बँकेने आजवर दैदिप्यमान कारभार उभा केला आहे.(Talegaon-Dabhade) तळेगाव येथे 22 वर्षापूर्वी पुणे पीपल्स को.ऑपरेटिव्ह बँकेची शाखा सुरू झाली आहे. तळेगाव विभागात 2500 मतदार आहेत. जास्तीत जास्त मतदान करून उत्कर्ष पॅनलला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन बबनराव भेगडे यांनी केले.

 

यावेळी प्रास्ताविक करताना बँकेचे अध्यक्ष  ॲड सुभाष मोहिते म्हणाले पुणे पीपल्स बँक 1952 ला सुरू झाली. अर्थात 70 वर्षे झाली. मात्र बँकिंग क्षेत्रातमध्ये गेल्या पंधरा वर्षांत एकूण भागभांडवल 3 कोटीवरून 23 कोटी झाले. राखीव निधी 40 कोटी रुपयांवरून 161 कोटी रूपये, ठेवी 273 कोटीवरून 1273 कोटी रूपयांच्या ठेवी, तर एकूण कर्ज ही 131 कोटींवरून 800 कोटी रुपयांपर्यंत आणि नफा 1.81 कोटींवरून 15.89 कोटींपर्यंत वाढलेला आहे. अशा पध्दतीने बँकेच्या प्रगतीचा आलेख हा कायम चढत्या क्रमाने प्रगतीकडेच गेलेला दिसतो आहे.(Talegaon-Dabhade) ही बाब अतिशय प्रेरणादायी असून बँक आर्थिक दृष्टया सक्षम झाल्याचा हा एक पुरावाच असल्याचे ठामपणे सांगत हीच या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संचालक मंडळाची यशस्वीतेची पावती आहे यासाठी भविष्य काळामध्ये आपल्या बँकेला यशस्वी वाटचाल करण्यासाठी उपस्थित सर्व सभासदांनी 28 तारखेला विमानाच्या चित्रावर शिक्का मारून सर्वांना विजयी करावे असे आवाहन यावेळी मोहिते यांनी केले.

 

बँकेला स्वताची संस्कृती, विशिष्ट विचार, बहुजनांची बँक अशी वैशिष्ट्ये असून या 15 वर्षात या आर्थिक माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधी करता येईल व 15 वर्षात काही महत्त्वपूर्ण गोष्टी करण्यात आल्या. मिटिंग भत्ताही कधीच एकाही संचालकानी घेतला नाही असे सांगत तळेगामध्ये बँकेसाठी पुढील काळासाठी सुसज्ज जागा व इमारत उभी करणार असल्याचे मोहिते यांनी आश्वासित केले.(Talegaon-Dabhade)यावेळी सुरेश चौधरी,गणेश खांडगे, गणेश काकडे, कामगार प्रतिनिधि संदीप गाडे, रमेश जाचक, अमृत दरेकर, विजय निंबळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नंदकुमार कोतुळकर यांनी केले तर आभार बँकेचे संचालक जनार्दन रणदिवे यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.