Talegaon Dabhade : संतोष भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पुणे जिल्हा केसरी’ बैलगाडा शर्यतीचे आयोजन

एमपीसी न्यूज : श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे (Talegaon Dabhade) आधारस्तंभ, पीएमआरडीएचे सदस्य, माजी नगरसेवक संतोष छबुराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य 20-20 निमंत्रित ‘पुणे जिल्हा केसरी’ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. नाणोली येथील हिंदकेसरी घाटात रविवारी (दि. 30) सकाळी सात वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दरम्यान बैलगाडा शर्यतीचे तयारीचा आढावा आमदार सुनिल शेळके आणि संतोष भेगडे यांनी घेतला.

Wakad News : एम्एनजीएलची टाकी फुटून गॅस गळती; सकाळपासून नागरिकांचा रखडला स्वयंपाक

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार युवानेते पार्थ पवार,आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, माजी आमदार कृष्णराव भेगडे,माजी मंत्री मदन बाफना,बाळा भेगडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माऊली दाभाडे यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दत्तात्रय भरणे,अण्णा बनसोडे, रवींद्र धंगेकर, महेश लांडगे, अतुल बेनके, निलेश लंके, चेतन तुपे, अशोक पवार, सुनील टिंगरे, दिलीप मोहिते पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबुराव वायकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

येथील श्री डोळसनाथ महाराज मंदिरात गुरुवारी (दि.27) सकाळी 8 ते 12 दरम्यान लकी ड्रॉ पद्धतीने टोकण दिल्याची माहिती संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या संयोजकांनी दिली. प्रथम क्रमांकास 1 लाख 11 हजार 111 रूपये व द्वितीय क्रमांकास 1 लाख रुपये, फळी फोड गाड्यास कुट्टी मशीन, घाटाचा राजा भव्य चषक, पुणे जिल्हा केसरी (Talegaon Dabhade) चांदीची गदा आणि मेगा फायनलसाठी दुचाकी अशी लाखोंची बक्षिसे दिली जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.