Talegaon Dabhade: स्वतःच्या समस्या बाजूला ठेवून, 85 वर्षीय आजोबांनी कोरोना विरुद्ध लढ्यासाठी दिला एक लाखांचा निधी

Talegaon Dabhade: Putting aside his own problems, 85-year-old Senior Citizen donates Rs 1 lakh to fight Corona

एमपीसी न्यूज (प्रदीप साठे) – आपल्या वैयक्तिक आणि पत्नीच्या आरोग्याच्या समस्या, त्यासाठी येणारा खर्च याचा जराही विचार करता तळेगाव दाभाडे येथील एका 85 वर्षीय आजोबांनी देशावर ओढवलेल्या कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी त्यांच्या बचतीच्या रकमेतून ‘पीएम केअर्स’ फंडाला एक लाख रुपयांचा निधी देऊन एक चांगला आदर्श घालून दिला आहे. 

सामाजिक सहयोग उपक्रम तथा कॅप या संस्थेचे एक अति रिष्ठ सदस्य गजानन शंकर निलवर्णे असे या आजोबांचे नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पीएम केअर्स फंडाला आपल्या वैयक्तिक बचतीतून रुपये एक लक्ष इतका निधी दिला आहे. बँक ऑफ इंडियामार्फत त्यांनी ही रक्कम पीएम केअर्स फंडमध्ये जमा केली.

_MPC_DIR_MPU_II

देशावर ओढवलेल्या अभूतपूर्व अशा कोरोना संकटात निलवर्णे आजोबांनी यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेला सर्व कॅप सदस्यांनी अभिवादन केले. आम्हाला असे सदस्य संघटनेत आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो, अशा भावना कॅपच्या सदस्यांनी व्यक्त केल्या.

निलवर्णे आजी मेंदूच्या विकाराने आजारी असून स्वत: निलवर्णे आजोबा सुद्धा वयपरत्वे मदतीशिवाय हिंडू-फिरु शकत नाहीत.  निलवर्णे आजींसाठी स्वतंत्र अटेंडट आहे. दोघांचा औषधपाण्याचा खर्च तसेच वैयक्तिक खर्च यांचा मेळ घालून शिल्लक बचतीतून त्यांनी कोरोना संकटाविरुद्ध लढ्यासाठी आर्थिक मदत करुन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.