Talegaon Dabhade : चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा

एमपीसी न्यूज – मुलांमधे आत्मविश्वास,तार्किक (Talegaon Dabhade) दृष्टिकोन, विचार व निर्णयामध्ये सुसूत्रता येण्याच्या उद्देशाने इंदोरी येथील चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. पालकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले.
चैतन्य चॅरिटेबल फाउंडेशन संचालित चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई),इंदोरी येथे (दि 16) रोजी छोट्या व मोठ्या गटांमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा प्रामुख्याने जल,पृथ्वी,वायू अग्नी या चार गटांमध्ये झाली.मुलांमधे आत्मविश्वास, तार्किक दृष्टिकोन, विचार व निर्णयामध्ये सुसूत्रता इत्यादी गुण वाढावे या दृष्टीने विद्यालयाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
विद्यार्थ्यांना विज्ञान, कला राजकारण, खेळ,सिनेसृष्टी, भाषा आणि साहित्य इत्यादी अनेक क्षेत्रातील प्रश्न विचारण्यात आले. छोट्या व मोठ्या दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये अतिशय आत्मविश्वासाने प्रश्नांची उत्तरे दिली .
या स्पर्धेला ‘मावळ सत्य” या दैनिकाचे वार्ताहर रामदास वाडेकर उपस्थित होते. त्यांनी यावेळी विद्यालयामध्ये राबवत असलेल्या सर्व स्पर्धांचे व कार्यक्रमाचे कौतुक केले.

त्यांनी संस्थेचे चेअरमन भगवान शेवकर, विद्यालयाच्या प्राचार्या जेसी रॉय, सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक, यांच्याशी सुसंवाद साधला.
त्यांनी घेतलेल्या मुलाखतीत भगवान शेवकर यांनी आपले मत व्यक्त केले कि, ‘विद्यालयांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी उद्याच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहावा यासाठी अशा स्पर्धांचे  आयोजन करण्यात येते.
विद्यालयाच्या प्राचार्या जेसी रॉय यांनीही स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना प्रेरणा दिली.
आजच्या स्पर्धेच्या कार्यक्रमाला पालकांनीही आपली उपस्थिती दर्शवली. विद्यार्थी पालकांपैकी आपले मत व्यक्त करताना श्री अविनाश अहिरराव म्हणाले कि,’शाळेमध्ये राबवत असलेल्या या स्पर्धा कौतुकास्पद आहेत, तसेच विद्यार्थ्यांनीही आपले ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी आपला वेळ बातम्या पाहणे  व  वर्तमानपत्र वाचणे यावर व्यतित करावा.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीयगीत वंदे मातरमने (Talegaon Dabhade)  झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.