Talegaon Dabhade : पोलीस बांधवांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे

एमपीसी न्यूज- नवलाख उंबरे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवांना राख्या बांधुन एक ऋणात्मक कार्यक्रम करण्याचा प्रयत्न पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभाताई सुदामराव कदम यांनी केला.

पोलीस बांधवांमुळे समाजात महिला वर्ग सुरक्षित आहे. राखी हे बहीणभावाच्या विश्वासाचे, प्रेमाचे, रक्षणाचे प्रतीक आहे. भावाने बहिणीला दिलेला विश्वास म्हणजे रक्षाबंधन. त्याचाच एक भाग व कर्तव्य म्हणून पोलीस बांधवांना राखी बांधून शोभाताई कदम यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला.

यावेळी नवलाख उंबरे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील, पंचायत समितीच्या सदस्या ललिताताई कोतुळकर, नवलाख उंबरे गावच्या उपसरपंच ज्योती बधाले, ग्रामपंचायत सदस्या उषाताई नरवडे, उषाताई जालींदर शेटे, वैशाली मालपोटे, रत्नमाला आंभोरे, हौसाबाई कदम, निलम वायकर, अर्चना वायकर, मेघा कदम सुदामराव कदम, जालींदर शेटे, विठ्ठल बधाले, शामराव कदम, बारकु वायकर व यशराज कदम व सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.