Talegaon Dabhade : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहाने केला साजरा

एमपीसी न्यूज – तळेगावचे ग्रामदैवत डोळसनाथ महाराज मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. बुधवारी (दि.17) दुपारी बारापासून विविध धार्मिक कार्यक्रमांना (Talegaon Dabhade) सुरुवात झाली. यावेळी श्रीराम जन्माचा पाळणा आणि भजन झाले.भाविकांनी आपापल्या घरातून आणलेल्या प्रसादाचे वाटप केले अशी माहिती श्री डोळसनाथ मंदिर विश्वस्त राजेश सरोदे यांनी दिली.

 

आज बुधवार (दि 17) तळेगावचे ग्रामदैवत डोळसनाथ महाराज मंदिरात जोगेश्वरी माता महिला भजन मंडळाच्या महिलांनी श्रीरामाचे पूजन केले. तसेच रामरक्षा  स्त्रोत, श्री राम जयराम जयजय राम जप व श्रीरामाची आरती  म्हणत राम जन्मोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला.यावेळी अनेक महिला,लहान मुली उत्साहाने सहभागी झाल्या व या सोहळ्याचा यथोचितपणे सर्व भाविकांनी आनंद घेतला. भाविकांनी आपापल्या घरातून खिरापत,शंकर पाळ्या,थालीपीठ इत्यादी प्रसादाचे वाटप केले. सायंकाळी 4.00  ते  5.00 वाजता श्री डोळसनाथ मंडळ महिलांचा हरिपाठ व भजन झाल्यावर 6.00 वाजता विष्णुसहस्र पठणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

Alandi : श्रीरामनवमी निमित्त माऊलींचे शिंदेशाही चंदनउटी रूप पाहण्यास भाविकांची गर्दी

           

विठ्ठल मंदिरात रामनवमी साजरी 
राही रखुमाई विठ्ठल मंदिरात सकाळी काकड आरतीच्या निमित्ताने रामरायाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शिवदास नंबियार परिवाराकडून पूजा झाली.यावेळी विश्वस्त बाळासाहेब आरडे, यतीनभाई शहा,पूजारी अतुल देशपांडे, हभप दरेकर,संपत गराडे, शिवाजी सुतार,नलिनी सरोदे, निशा शेळके,सीमा कुलकर्णी कुलकर्णी,सीमा शेलारआदी भाविक उपस्थित होते.श्रीरामाचे पूजन होऊन आरती झाली. यावेळी लापशीचा प्रसाद वाटण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.