Talegaon Dabhade : सरसेनापती दाभाडे घराण्याचे वंशज यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव समितीच्यावतीने ( Talegaon Dabhade)सरसेनापती दाभाडे घराण्याचे वंशज व भक्तगणांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव उत्साहात संपन्न झाला. अभिषेक,महापूजा,महाप्रसाद,कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे यानिमित्त आयोजन करण्यात आले.राम नवमी निमित्त श्रीराम ग्रामप्रदक्षिणा झाली. श्रीरामाच्या पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

यावेळी श्रीमंत अंजलीराजे दाभाडे, श्रीमंत सत्येंद्रराजे दाभाडे,श्रीमंत याज्ञीसेनीराजे दाभाडे,आमदार सुनील शेळके,दाभाडे पतसंस्थेचे चेअरमन सुनील दाभाडे, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे,संतोष दाभाडे पाटील, साहेबराव दाभाडे,अशोक दाभाडे, शोभा परदेशी,रामभाऊ काळोखे, आण्णासाहेब दाभाडे,संजय बाविस्कर,नीलिमा दाभाडे,शोभा भेगडे,जन्मोत्सव समिती अध्यक्ष विजय दाभाडे,सागर दाभाडे,सोमनाथ दाभाडे,विशाल दाभाडे,गणेश बांदल आदी मान्यवरांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित ( Talegaon Dabhade) होते.

Today’s Horoscope 19 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

येथील दाभाडेआळीमध्ये असलेल्या श्रीराम मंदिरात सकाळी सौ सोनाली संभाजी बबनराव मराठे (लोणावळा) यांच्या हस्ते सकाळी अभिषेक व महापूजा करण्यात आली.दुपारी श्रीराम जन्मानिमित्त ह.भ.प. शंकर जगताप महाराज यांचे किर्तन व श्रीराम जन्मसोहळा भक्तीमय वातावरणामध्ये संपन्न झाला. त्यानंतर बाळासाहेब भागुजी गायकवाड यांचे कडून आलेल्या भाविकांना महाप्रसाद करण्यात आला.

सायं. ५.३० वा. श्रीराम प्रतिमा व पादुकांची पालखीचे ग्राम- प्रदक्षिणेसाठी प्रस्थान झाले. नागरिकांनी जागोजागी फुलांचा वर्षाव करून रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले.पालखी दाभाडे आळीतील मंदिरापासून डोळसनाथ मंदिर,गणपती चौक, बाजार पेठ,तेली आळी,मारुती मंदिर, जिजामाता चौक, सुभाष चौक,शाळा चौक येथून राम मंदिरामध्ये समारोप करण्यात आला.पालखीच्या पुढे दिंडी,बॅन्ड,भजन,ढोल लेझीम, मल्लखांब पथकांच्या भव्य शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये श्रीराम नवमी जन्मोत्सव समितीचे  उपाध्यक्ष अक्षय शेलार, ऋषिकेश ठोंबरे,खजिनदार स्वप्निल दाभाडे, सहखजिनदार रूपेश गायकवाड,मयुर शिंदे,कार्याध्यक्ष अक्षय बेदरकर, चिटणीस केतन दाभाडे,अथर्व ठाकर, सरचिटणीस अनिकेत दळवी,सौरभ तापकिर,भांडार प्रमुख अजय दाभाडे, प्रसिद्ध प्रमुख आकाश दाभाडे,गौरव तापकिर,अक्षय दाभाडे आदींनी सक्रीय सहभाग घेतला होता. या कार्यक्रर्मासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ( Talegaon Dabhade)  होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.