Talegaon Dabhade : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ हिंगे यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव येथे राहणारे मूळचे इंदोरी येथील रहिवासी, शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ बाबुराव हिंगे (वय 64) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू ,तीन बहिणी असा परिवार आहे.

त्यांनी सुरूवातीच्या काळात काही वर्षे जनरल हाॅस्पिटलमध्ये नोकरी केली. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3 वाजता तळेगाव येथील बनेश्वर स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सिनेअभिनेता अमोल हिंगे यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.