Talegaon Dabhade: परुळेकर विद्यानिकेतनच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमात साजरी केली दिवाळी!

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील रामभाऊ परुळेकर विद्या निकेतनच्या वतीने विश्रामधाम वृद्धाश्रम येथे आजी-आजोबांसमवेत दिवाळी साजरी करण्यात आली.

खूप वर्षांपासून वसुबारस या दिवशी शाळेचे आजी- माजी विद्यार्थी आणि या प्रकल्पाच्या प्रमुख स्नेहल बाळसराफ नियमित वृद्धाश्रमातील आजी- आजोबांसोबत आपली दिवाळी साजरी करून त्यांना आनंद देतात.

या प्रकल्पासाठी कोणाला सूचना द्यावी लागत नाही सर्व आजी- माजी विद्यार्थी स्वखुशीने सहभाग घेतात. यावर्षी पाऊस बरसत असल्याने खऱ्या अर्थाने विश्रामधाम येथे आनंदाची बरसात झाली, असे स्नेहल बाळसराफ यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विश्रामधाम येथील अनिल टिपणीस आणि सुहास घाणेकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी मानसी बनसोडे, जान्हवी लचके, ऐश्वर्या वाळुंज, सेजल भुजबळ, नेहा बाविस्कर, प्रांजली वाबळे, तृप्ती लाड, गौरजा गायकवाड, तनुजा उगीले, हर्षदा साबळे, येनिसा सय्यद, साक्षी फंड आणि सर्वेश जाधव यांनी आजी-आजोबांचा आशीर्वाद घेऊन दरवर्षी असेच येत राहू, असे सांगून आनंद व्यक्त केला.

विद्यार्थी सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून आपल्या व्यस्त जीवनातून विश्रामधाम येथे दिवाळी साजरी करतात त्यामुळे येथे आनंद पसरतो, असे आजी- आजोबांनी सांगून मुलांना आशीर्वाद दिले. यावेळी कलाशिक्षक संजय जाधव, पर्यवेक्षक एल. डी. कांबळे आणि विद्यार्थी उपस्थित होते. शाळेचे विश्वस्त नंदन रेगे आणि मुख्याध्यापिका पी. एस. चौधरी यांनी या उपक्रमाबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.