_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Talegaon Dabhade : ‘तरुणांनो उद्योजक व्हा’ उद्योजक रामदास काकडे यांची फेसबुक मुलाखत येत्या रविवारी

Talegaon Dabhade : Ramdas Kakade's Facebook interview on 'Become an Entrepreneur' on Sunday

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने यशस्वी उद्योजक रामदास काकडे यांची मुलाखत रविवारी (दि.24) मे रोजी सकाळी 11 वाजता फेसबुकमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे.

_MPC_DIR_MPU_II

ही मुलाखत नापासांची शाळा याचे अध्यक्ष नितीन फाकटकर घेणार आहेत. सध्या लॉकडाऊनच्या काळात सर्व ठिकाणी नोकरी आणि उद्योग यांच्या बऱ्याच अफवांनी तुफान घातलेले आहे. त्यामुळे सर्वच तरुण उद्योग आणि नोकरीबद्दल चिंतेत राहिलेले दिसत आहे. यामध्येच तरुणांना व्यवसायाबद्दल अधिक माहिती व्हावी, व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी व त्यावर कशाप्रकारे मात करून आपण आपल्या व्यवसायात यशस्वी होऊ याबद्दल काकडे यांचे मत तरुणांना ऐकण्यास मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.