Talegaon Dabhade: राम मंदिर भूमिपूजनानिमित्त रामराजे ग्रुपच्या वतीने 51 किलो पेढे वाटप

तळेगाव दाभाडे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचे ऐतिहासिक भूमिपूजन व शिलान्यास अतिशय उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाले असून कोट्यावधी नागरिकांच्या श्रद्धेला यातून बळकटी मिळणार आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या प्रित्यर्थ नागरिकांना तळेगाव दाभाडे येथील रामराजे ग्रुपच्या वतीने 51 किलो पेढे  वाटप करण्यात आले व मारुती मंदिर येथे प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

यावेळी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश तात्या भेगडे,  मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे, नगरसेवक अमोल शेटे, शहराध्यक्ष  रवींद्र माने, सरचिटणीस विनायक भेगडे,  उपाध्यक्ष विनोद (बंटीदादा) भेगडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन रामराजे ग्रुपचे विनोद  (बंटीदादा) भेगडे, महेश काकडे, संग्राम गायकवाड, विशाल भेगडे, बिपीन भेगडे, ऋषिकेश भेगडे पाटील, विनायक भेगडे, विनायक वसंत भेगडे, संदीप माने, कपिल देवडीगा, सागर पुरणकर, शैलेश बेल्हेकर, शुभम भेगडे, अक्षय चौधरी, नवनाथ वाजे इ. कार्यकर्त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.