Talegaon Dabhade: जनसेवा विकास समितीतर्फे 500 नागरिकांची ‘रॅपिड’ कोरोना टेस्ट

Talegaon Dabhade: 'Rapid' corona test of 500 citizens by Janseva Vikas Samiti. भाजी विक्रेते, पोलीस कर्मचारी, नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या टेस्ट. पाचशेपैकी आढळले सहा संशयित कोरोना रुग्ण,

एमपीसी न्यूज – तळेगाव शहराच्या हद्दीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तळेगाव शहर जनसेवा विकास समितीकडून रॅपिड अ‍ॅक्शन  टेस्ट किटच्या माध्यमातून एकूण 500 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सहा नागरिक संशयित कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण कानडे यांनी दिली.
 या तपासणीमध्ये प्रथमतः दि 4 जुलै  भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या सुमारे दीडशे व्यावसायिकांची टेस्ट घेण्यात आली तसेच दि 5 जुलै रोजी तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी असे 50 कर्मचाऱ्यांची टेस्ट घेण्यात आली व दि 6 जुलै रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृहामध्ये सुमारे 100 नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांची टेस्ट घेण्यात आली. याशिवाय तळेगावातील आदिवासी ठाकर वस्ती इतर सामान्य नागरिकांची टेस्ट घेण्यात आली.
यामध्ये भाजीपाला व्यवसाय करणा-या मधून 3 व्यावसायिक, रुग्णालयातील 2 परिचारिका व 1 नागरिक असे सहा संशयित पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती डॉक्टर कानडे यांनी दिली व त्यांची संस्थात्मक विलगीकरण  कक्षात रवानगी करण्यात आली.
याचे  काम पूर्ण करण्यासाठी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते गणेश काकडे, नगरसेवक निखील भगत, सुनील पवार, कल्पेश भगत यांनी परिश्रम घेतले.
यासाठीच्या सर्व खर्चाची जबाबदारी जनसेवा विकास समिती व त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.