Talegaon Dabhade: रवींद्र काळोखे यांचा नगर परिषदेच्या वतीने सत्कार

काळोखे यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला.

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या काळात चाकोरी बाहेर जात कार्य करणारे तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथील स्वागत कक्ष प्रमुख रवींद्र भिकाजी काळोखे यांचा त्यांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृहात श्री गणेश विसर्जन याबाबत नियोजनाची बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी काळोखे यांचा सत्कार करण्यात आला. काळोखे यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, सभागृह नेते अमोल शेटे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, नगरसेवक अरुण भेगडे पाटील, निखिल भगत, नगरसेविका विभावरी दाभाडे, कल्पना भोपळे, कल्पेश भगत, अरुण भेगडे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे आदींसह नगरपरिषदेतील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा जगनाडे यांनी काळोखे यांच्या कार्याचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.