Talegaon Dabhade: नामवंत बांधकाम व्यावसायिक अजित भालेराव यांचे निधन

एमपीसी न्यूज – नामवंत बांधकाम व्यावसायिक अजित वामनराव भालेराव (वय 70) यांचे आज (बुधवारी) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यात रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारादरम्यान निधन झाले.

अजित भालेराव यांनी तळेगाव दाभाडे व परिसरात विविध गृहप्रकल्पांची उभारणी केली होती. त्यांच्या पाठीमागे पत्नी अर्चना भालेराव, बंधू संजय भालेराव व बिपिन भालेराव तसेच रोहन व केतन हे दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

_MPC_DIR_MPU_II

काही दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती, मात्र उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

अजित भालेराव यांच्या पार्थिवावर आज (बुधवारी) संध्याकाळी सहा वाजता पुण्यात बाणेर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1