Talegaon Dabhade : प्रसिद्ध महिला शिल्पकार सुप्रिया शिंदे यांना वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाच्या वतीने मानांकन

एमपीसी न्यूज – श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव आणि वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाच्या वतीने जगप्रसिद्ध पहिल्या महिला शिल्पकार सुप्रिया शेखर शिंदे यांना मानांकन देण्यात ( Talegaon Dabhade ) आले आहे. हा सोहळा येत्या रविवारी (दि.21) तळेगाव दाभाडे येथील तळेगाव-चाकण रोड येथील स्वामी समर्थ नगर, वनश्री नगरच्या शेजारी येथे सकाळी एकरा वाजता आयोजीत करण्यात आला आहे.

भारतातील पहिल्या महिला शिल्पकार सुप्रिया शेखर शिंदे, की ज्यांनी अबुधाबी येथे जागतिक शिल्पकला प्रदर्शनामध्ये जगभरात महिला शिल्पकार म्हणून आपला ठसा उमटवला होता. संपूर्ण भारतभरात वेगवेगळ्या ठिकाणी सुप्रिया शेखर शिंदे यांना प्रथम महिला शिल्पकार म्हणून गौरवण्यात आलेले आहे.

Maval : पाण्यासाठी मुक्या जनावरांची भटकंती थांबणार

राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, भगत सिंग, सुखदेव, राजगुरू,  स्वामी समर्थ,इत्यादी अनेक तसेच शरद पवार, किसनराव बाणखिले असे राजकीय पुढारी यांचे पुतळे त्यांनी घडविले. आणी आता आणखीन एक मानाचा तुरा  त्यांच्या शिरपेचात डौलाने मिरवणार आहे आणि तो म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिंदे यांना मानांकन प्रदान केले जाणार आहे.

श्री स्वामी समर्थ यांची 1131 किलोची प्युअर तांब्याची मूर्तीची एक संघ कास्टिंग यापूर्वी कोणीच केले नाही. त्या कामगिरी बद्दल हा बहुमान सुप्रिया शेखर शिंदे यांना वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे सीईओ पवन सोळंकी यांचे हस्ते सन्मान प्रदान केला जाणार ( Talegaon Dabhade ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.