Talegaon Dabhade : सरस्वती विद्यामंदिर मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील सरस्वती विद्या मंदिर या शाळेत 74 व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात (Talegaon Dabhade ) आला. ध्वजवंदन केल्यानंतर कवायत, सूर्यनमस्कार, लाठीकाठी, गीत, नृत्य, भाषणे, सत्कार सोहळा असा भव्य कार्यक्रम घेण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यापूर्वी कार्यवाह प्रमोद देशक, खजिनदार सुचित्रा चौधरी, सदस्य विश्वास देशपांडे, सुनील आगळे, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका रेखा परदेशी, प्राथमिकचे मुख्याध्यापक नवनाथ गाढवे, बालवाडी प्रमुख सोनाली काशीद यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करण्यात आले. संस्थेचे सदस्य विश्वास देशपांडे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.

Pune Crime News : सीएकडून 30 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला अटक

यावेळी विद्यार्थ्यांना साहित्य कवायत प्रकार सादर केले. माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, देशभक्तीपर समूहगीत, ‘स्वातंत्र्योत्तर भारत’ या विषयावर तक्ते प्रदर्शन, संचलन इत्यादीचे सादरीकरण केले. त्याचप्रमाणे इयत्ता आठवीतील तनिष्का इखे व मोनाली गुंड यांनी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूह नृत्य सादर केले व प्रकल्प प्रदर्शन हॉल मध्ये भरवले. स्काऊट राज्य पुरस्कार प्राप्त पाच विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या स्काउटर छाया सांगळे यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे माध्यमिकच्या मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांना विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेल्या माहितीतून ‘प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार अध्यक्ष सुरेश झेंड यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. सूत्रसंचालन  नितीन येडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राथमिकचे मुख्याध्यापक नवनाथ गाढवे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने पालक व माजी विद्यार्थी (Talegaon Dabhade ) उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.