Talegaon Dabhade : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या तीनही शाळांचा निकाल 100 टक्के

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (Talegaon Dabhade ) मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल शुक्रवारी (दि.2) जाहीर झाला. यामध्ये इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कांतीलाल शाह विद्यालय तळेगाव दाभाडे, श्रीराम विद्यालय नवलाख उंब्रे आणि संत तुकाराम विद्यालय शिवणे या तीनही शाळांनी आपली 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. तीनही शाळांमध्ये पहिल्या क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे व कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

 

संस्था संचलित कांतीलाल शाह विद्यालय तळेगाव दाभाडे, श्रीराम विद्यालय नवलाख उंब्रे आणि संत तुकाराम विद्यालय शिवणे मावळ या तिनही विद्यालयांचा दहावी शालांत परीक्षेचा निकाल 100% लागला आहे. या निकालाबद्दल समाधान व्यक्त करताना संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे म्हणाले की,इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेला गुणवत्तापूर्ण यशाची मोठी परंपरा लाभलेली आहे. आजचे यशस्वी विद्यार्थी भविष्यात संस्थेचे पर्यायाने मावळ तालुक्याचे नाव निश्चित मोठे करतील असा मला विश्वास वाटतो.

 

यंदा शालांत परीक्षेत कांतीलाल शाह विद्यालयाने आपली अकरा वर्षांची 100% निकालाची परंपरा राखली आहे. विद्यालयातील भक्ती पोकळे ह्या विद्यार्थिनीने 94.60% गुण मिळवून  प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच कृपाली शिंदे ही विद्यार्थिनी 91.80% गुण मिळवून दुसरी आली आहे. तिसरा क्रमांक 91.60% गुण मिळवून सत्यम चौबे व कु सत्यम राय यांनी विभागून पटकाविला आहे.तसेच 51 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, 13 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी व 3 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवून यश संपादन केले आहे.

PCMC : ब्लूमबर्ग इनिशिएटीव्ह फॉर सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चर पुरस्काराने महापालिका सन्मानित

 

नवलाख उंब्रे येथील श्रीराम विद्यालयानेही 100% निकाल देत आपली परंपरा राखली आहे. विद्यालयातील ऐश्वर्या शेवकरी हिने 90.40% गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली तर श्रावणी धायबर हिने 88.60% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आणि समिक्षा चोपडे हिने 84.20% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. परीक्षेस बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थी हे विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत, एकोणीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर सव्वीस विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले असून उर्वरित पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

संस्थेच्या शिवणे येथील श्री संत तुकाराम विद्यालयानेही आपली उज्ज्वल परंपरा कायम राखत 100% यशावर आपले नाव कोरले आहे. विद्यालयातील सार्थक पिंगळे यांने 92.20% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे तर सार्थक शिंदे यांने 88.40% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. ओम शेटे याने 87% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.

 

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे,कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा, तसेच विश्वस्त गणेश खांडगे,संजय साने, निरूपा कानिटकर,परेश पारेख,संदीप काकडे,युवराज काकडे,प्राचार्य डाॅ संभाजी मलघे, प्राचार्य संजय आरोटे आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा (Talegaon Dabhade ) दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.